मुरगुड ( शशी दरेकर ) – सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना (एन सी सी) व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षानिमित्त ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत कागल तालुक्यातील प्रमुख महाविद्यालयांतून संकलित झालेल्या अमृत कलश शोभायात्रा महाविद्यालय ते शिंदेवाडी पर्यंत काढण्यात आली.
या शोभायात्रेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील. एन सी सी प्रमुख लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी डॉ. एम. ए. कोळी, प्रा.डी. व्ही. गोरे, प्रा. संजय हेरवाडे, प्रा. रोहन पाटील, प्रा. सुशांत पाटील , डॉ.शिवाजी होडगे, डॉ. यु. आर. शिंदे, डॉ. के.एस. पवार, प्रा.पी.एस. सारंग, प्रा. टी. एच. सातपुते, प्रा. एम. आर. बेनके, प्रा. डी. पी. साळुंखे, प्रा. व्ही. ए. कांबळे, डॉ. एम.एस. पाटील, प्रा. एस. ए. दिवाण, प्रा. प्रशांत कुचेकर व इतर प्राध्यापक वृंद तसेच एनसीसी सर्व कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.