मुरगूड ( शशी दरेकर ) – अंत:करणात भावनांची खळबळ उडवून देणारं लेखन दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधा प्रमाणे अंतःकरणाच्या गाभाऱ्यात दरवळत राहतं. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भैरवनाथ डवरी यांनी केले. बोरवडे ता. कागलं येथील बोरवडे विद्यालय येथे वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधत आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुख्याध्यापक ए आर वारके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
श्री भैरवनाथ डवरी म्हणाले -वाचनाने माणूस समृद्ध होतो. वाचनाने माणूस घडतो, संस्कारित होतो, समृद्ध होतो. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर वाचन संस्कृती जोपासली पाहिजे असेही ते म्हणाले. वास्तवदर्शी साहित्य थेट काळजाला भिडतं हे सांगत साहित्यिक डवरी यांनी लिहिलेल्या आणि पुणे येथील दर्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या गावमाया या पुस्तकातील “अधूरे स्वप्न” ही ग्रामीण कथा ग्रामीण ढंगात श्रोत्यांना ऐकविली . श्रोते मंत्रमुग्ध तर झालेच , शिवाय फुले विकून मुलीला दोन फ्रॉक घेण्याचं स्वप्न उराशी बाळगून तलावात कमळफूले काढत असताना विकलांग बापाला जीव गमावावा लागला. आणि अखेर स्वप्न अधुरे राहीले ही कथा ऐकूण सारे श्रोते भावुक झाले.
यावेळी हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वृतपत्र व्यवसायातील युवा उद्योजक रामेश्वर सावरतकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला . डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन भैरवनाथ डवरी, मुख्याध्यापक श्री वारके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ई.डी.घोरपडे, डी.डी. चौगले, पी.डी. वारके, एस. डी. बचाटे, आर. पी.वारके, मनीषा साठे,गीता बलुगडे, राधिका शिंदे, रेश्मा देवर्डेकर, कीर्ती साळुंखे, कृष्णात साठे, श्रीधर कांबळे, विलास कांबळे, मानसिंग जठार यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला आर. पी. वारके यांनी स्वागत व प्रस्तावित केले.डी. डी. चौगले यांनी आभार मानले.
फोटो ओळी – बोरवडे विद्यालय (ता.कागल) येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त बोलताना साहित्यिक भैरवनाथ डवरी. शेजारी ए. आर. वारके, ई.डी. घोरपडे व इतर