कागल : कागल नगरपरिषदे मार्फत महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा 2023 अंतर्गत 1 ऑक्टोबर 2023 एक तारीख एक तास हा स्वच्छता उपक्रम सकाळी 10.00 ते 11.00 दरम्यान कागल शहरामध्ये वीस ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले होते.
या अभियाना मध्ये वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग तसेच केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांच्यासह पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीराम पवार, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, नगरसेवक प्रवीण काळबर ,अरोग्य अधिकारी नितीन कांबळे,दस्थगिर पाखाली,आशिष शिंगण, बादल कांबळे यांच्यासह श्री शाहू हायस्कूल आणि नगरपरिषद शाळांचे चे विद्यार्थी एन.सी.सी विद्यार्थी ,शिक्षक ,मुख्याध्यापक प्रमुख मान्यवर नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व नागरीक बचत गटाचे महिला सदस्य, वनमित्र संघटनेचे सदस्य,छाया चित्रकार,पत्रकार सहभागी होवून शहरातील
- 1)बस स्टँड परिसर
- 2)बस स्टॅन्ड जवळ ब्रिज
- 3)संत रोहिदास विद्यामंदिर परिसर
- 4)विराज सिटी
- 5) शाहू स्टेडियम
- 6) तू.बा.नाईक शाळा
- 7)हिंदुराव घाडगे विद्यामंदिर परिसर
- 8)कोल्हापूर वेस
- 9)जुना घरकुल परिसर
- 10) गणेश नगर घरकुल परिसर
- 11) मेन रोड
- 12) पाझर तलाव
- 13)शिवाजी महाराज चौक
- 14)वाय. जी. हायस्कूल परिसर
- 15)यशवंत किल्ला परिसर
- 16)नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर
- 17)माळभाग शाळा
- 18)गैबी चौक परिसर
- 19)जिल्हा पारिषद रुग्णालय परिसर
- 20)शाहू उद्यान परिसर
या वीस ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेची शपथ देणेत आली.