
मुरगूड (शशी दरेकर) : दगडु शेणवी युवा मंच दौलतवाडी (ता. कागल) यांच्या वतीने येथील हरिनाम सप्ताहच्या समाप्ती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
मुरगूड येथे नुकताच श्रावण मासातील हरिनाम सप्ताह संपन्न झाला. या सप्ताहाच्या सांगता समारंभ प्रसंगी येथील दगडू शेणवी युवा मंच व मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या सहकार्यातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्त गावातील सर्व नागरीकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी येथील वारकरी सांप्रदायातील ह. भ. प. रमेश जाधव, बाळु साळोखे, आश्रामा जाधव, नेताजी कानडे, पाडुंरगं भोसले, महादेव जाधव यांच्या पुढाकारातून दगडु शेणवी व त्यांचे सहकारी राजू चव्हाण, गणेश तोडकर, राजू सावंत, निशांत जाधव व युवा मंचचे अध्यक्ष विशाल काबंळे, सुरज मुसळे, युवराज जाधव व सर्व सदस्य यांचा गौरव करण्यात आला.