मुरगुडात एसटीचा 76 वा वर्धापन दिन प्रवासी व अधिकाऱ्यांच्या सत्काराने संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मूरगूडच्या बस स्थानकावर एसटीचा 76 वा वाढदिवसानिमित एसटीतील प्रवासी आणि अधिकारी यांचा सत्कार तसेच केक कापण्यात आला.

Advertisements

         स्वागत वाहतूक नियंत्रक शशिकांत लिमकर यांनी केले. यावेळी सेवानिवृत्ती निमित्त मुरगूडचे वाहतूक नियंत्रक पांडुरंग लोकरे तसेच ‘शिवराज’चे सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक रवींद्र शिंदे यांचा एसटी विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकात राजू जठार यांनी एसटीच्या ७६ वर्षातील खडतर प्रवास ते आणि आजचा सुवर्णकाळ याविषयीची माहिती उपस्थितांना दिली.

Advertisements

       वाहतूक नियंत्रक पांडुरंग लोकरे यांनी आपल्या सेवा काळात सहकारी, वरिष्ठ अधिकारी व प्रवासी या सर्वांनीच केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सहाय्यक वाहतूक निरीक्षक आनंदा महादेव कोळी यांच्या हस्ते बस समोर केक कापून जल्लोष करण्यात आला.

Advertisements

वरिष्ठ लिपिक संग्राम लाड, मुरगुड वाहतूक नियंत्रक पांडुरंग लोकरे, शशिकांत लिमकर, राजू जठार, दिलीप घाटगे, वस्ताद आनंदा गोधडे, शिवराजचे माजी प्राचार्य महादेव कानकेकर, दिगंबर परीट, बंडा भारमल, राजू चव्हाण,  सुभाष अनावकर, अंजली ढेरे, प्रशांत चौगुले यांच्यासह चालक, वाहक, प्रवासी महिला- पुरुष व शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाहतूक नियंत्रक दिलीप घाटगे यांनी आभार मानले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!