आमदार हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याला यश
तब्बल ४० वर्षानंतर मिळाला मालकी ताबा
कागल, दि.१९: हमीदवाडा ता. कागल येथील ४४ भूखंड धारकांना हक्काची मालकीपत्रे मिळाली आहेत. आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते ती भूखंड धारकांना देण्यात आली. आमदार श्री. मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. तब्बल ४० वर्षानंतर भूखंड धारकांना स्वः हक्काची मालकी पत्रे मिळाली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, १९८० साली गावातील भूमिहीन, गरजू व मागासवर्गीय कुटुंबीयांना घरांच्या बांधकामासाठी शासनाच्यावतीने भूखंड देण्यात आले होते. ४४ भूखंड धारकांना भूखंड मिळालेले होते. परंतु; मालकी पत्रामध्ये भूखंड धारकांची नावे नव्हती. महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत भूखंड धारकांची नावे तातडीने लावण्याच्या सूचना आमदार श्री. मुश्रीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या होत्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, राष्ट्रवादीचे कागल तालुकाध्यक्ष विकास पाटील, उमेश डावरे, कृष्णात बंडा बुरटे, आनंदा रंगापुरे, संजय गंदुगडे, जोतिराम मोगणे, प्रदीप वरपे, सिद्राम पाटील, महेश पारळे, विलास कुंभार, संभाजी कुंभार, रघुनाथ गुरव, भगवान चोपडे, श्रीधर बुरटे, तुकाराम किल्लेदार, अमर वासनकर आदी प्रमुखासह भूखंडधारक उपस्थित होते.