कागल / प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्या अनुषंगाने गावोगावी जाऊन मतदार यादी वाचन करणे, राजकीय पक्षांची मदत घेणे. मतदान केंद्राची पाहणी करणे. बी एल ओ यांचे प्रशिक्षण घेणे. महाविद्यालयांमधून युवकांची मतदार नोंदणी करणे. या विशेष कार्यक्रमाद्वारे मतदार नोंदणी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे .अशी माहिती कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
कागल तहसीलदार कार्यालयात पत्रकार बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवासी नायब तहसीलदार रुपाली सुर्यवंशी मॅडम, मृगेंद्र हळबे, संदीप काळेआदी उपस्थित होते.
तहसीलदार शिल्पा ठोकडे पुढे म्हणाल्या निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त कार्यक्रम जाहीर केला आहे. कागल विधानसभा अंतर्गत दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत दावे, हरकती, स्थानांतर मतदानाचा तपशील दुरुस्ती, नवीन ओळखपत्रासाठी नमुना क्रमांक आठ प्रत्येक मतदान केंद्रावर स्वीकारले जाईल.
त्या म्हणाल्या 12 जुलै रोजी बी एल ओ अॅपचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. 15 जुलै अखेर प्रत्येक मतदान केंद्रावर सरपंच व ग्रामपंचायत सदस्य बी एल ए मान्यवर व्यक्ती यांचे सभेत मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. दुबार मतदार, विवाह किंवा कायमस्वरूपी स्थलांतर केलेल्याना वगळण्यात येणार आहे. नावात दुरुस्ती, 80 वर्षावरील मतदार तसेच कृष्णधवल छायाचित्र अथवा अस्पष्ट छायाचित्र असलेल्या मतदारांची पडताळणी केली जाईल.
सतरा वर्षावरील युवकांची मतदार नोंदणी वाढावी म्हणून महाविद्यालये, जुनियर कॉलेजेस तंत्र शिक्षण विभाग या ठिकाणी प्रवेशावेळी मतदार नोंदणी करून घेण्यात येणार आहे. महिला, युवक, तृतीयपंथी व दिव्यांग मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी बीएलए मार्फत सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी शेवटी केले.
Keep up the amazing work!