सलग बारा वर्षे निकालाची परंपरा कायम
व्हनाळी(वार्ताहर) : व्हनाळी ता. कागल येथील कै. मेजर आनंदराव घाटगे आयटीआयचा शैक्षणिक वर्ष 2020-22 चा अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचा अंतिम वर्षाचा निकाल शंभर टक्के लागलाअसल्याची माहिती आयटीआयचे प्राचार्य आर .डी. लोहार यांनी दिली.
या संस्थेची स्थापना ऑगस्ट 2009 मध्ये झाली असून सन 2022 मध्ये सलग बारा वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा संस्थेने कायम ठेवली आहे .या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन मोटर मेकॅनिक व्हेईकल या ट्रेडच्या सात तुकड्यांना प्रशिक्षण दिले जाते.
अंतिम परीक्षेत उज्वल हे संपादन करणारे प्रशिक्षणार्थी पुढील प्रमाणे…..
१) फिटर विभाग —–
प्रथम क्रमांक= प्रणव शिवाजी डावरे (गोरंबे ८२.५० टक्के )
दिव्य क्रमांक = गणेश अर्जुन बाळांण्णा ( सुळकुड 81.16 टक्के )
तृतीय क्रमांक — तुषार उदय पाटील (मौजे सांगाव 76.50)
२) इलेक्ट्रिशन विभाग,
प्रथम = प्रणव जाधव (व्हनाळी 85.16)
द्वितीय = गिरीष घराळ. (सिद्धनेर्ली ८४.६६)
तृतीय = ओमकार सावंत (गोरंबे ८३.६६)
३) मेकॅनिक मोटर वेहिकल
प्रथम – मदनराज मोहन कांबळे (मसवे 89.83)
द्वितीय -अभिजीत रामचंद्र कुंभार (गोरंबे 87.36)
तृतीय – अभिषेक बाबुराव पाटील (म्हाकवे ८६.८३)
यशस्वी विद्यार्थ्यांना आयटीआयचे संस्थापक माजी आमदार संजयबाबा घाटगे सेक्रेटरी ,गोकुळ चे संचालक अंबरिषसिंह घाटगे, प्राचार्य आर .डी .लोहार, निदेशक ,अवधूत पाटील, दीपक जोंग, अभिजीत पाटील ,सौ सीमा मगदूम , सरिता पाटील,सुभाष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.