बॅक ऑफ बडोदा शाखा कागल ची कौतुकास्पद कामगिरी, ग्रामस्थ, कुटुंबीयांनी मानले आभार
कागल / प्रतिनिधी : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा-धारकाच्या अकस्मात मृत्युनंतर त्यांच्या कुटूंबियांना २ लाख रुपये विमा रकमेचा धनादेश बँक ऑफ बडोदा शाखा कागल च्या वतीने देण्यात नुकताच देण्यात आला.
बॅक ऑफ बडोदा कागल शाखेत ५० हजार खातेदार आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे विमाधारक विलास चव्हाण , रा.करनूर ,हे गेल्या २ ते ३ वर्षापासुन प्रतिवर्षी ४३६ रुपये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नियमित भरना करीत होते.
त्यांचा ०२ मार्च रोजी अकस्मात मृत्यू झाला . त्यांच्या मृत्युपश्चात पत्नी अंजली विलास चव्हाण यांना बँक ऑफ बडोदा शाखा कागल मुख्य व्यवस्थापक श्री. शिवाजी सर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंधक सौ.अनुजा भोसले यांच्या हस्ते २ लाखाचा धनादेश देण्यात आला. यावेळी बँकेचे अधिकारी तुषार पालवे,बँक मित्र अबासो शिंदे,सचिन स्वामी,विनायक पाटील तसेच इतर खातेदार उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे त्यांच्या कुटुंबीयांना या विमा योजनेची माहिती नसतांना करनूर चे बँक मित्र अबासो शिंदे यांनी माहिती देवून तसेच शाखाधिकारी तुषार पालवे यांनी कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन पाठपुरावा केला . धनादेश स्विकारताना विमल विलास चव्हाण, वैष्णवी चव्हाण, श्रेया चव्हाण,करण चव्हाण आदि उपस्थित होते.
प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना ९ मे २०१५ पासुन सुरू केलेली टर्म इन्शुरन्स योजना आहे. ज्यामध्ये योजनेच्या मुदती दरम्यान अकस्मात मृत्युच्या बाबतीत संरक्षण दिले जाते. ही योजना एक वर्षासाठी चालते आणि त्यानंतर सतत कव्हरेज साठी नूतनीकरण केले जाऊ शकते. प्रीमियम परवडणारा आहे आणि इन्शुअर केलेल्या बँक खात्यातून देय आहे. कव्हरेज कालावधीत मृत्यूच्या बाबतीत सम अॅश्युअर्ड दिले जाते. १८ वर्षापासून ५० वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी कव्हरेज उपलब्ध आहे. हे एक टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे जे कव्हरेज कालावधी दरम्यान केवळ मृत्यूचे संरक्षण करते. योजनेच्या अंतर्गत मॅच्युरिटी बेनिफिट दिले जात नाही. कव्हरेज एक वर्षासाठी प्रत्येक वर्षी १ जून रोजी सुरू होते आणि पुढील वर्षाच्या ३१ मे रोजी संपते.
योजनेसाठी प्रीमियम विमा धारकांच्या बँक खात्या द्वारे देय आहे. प्रीमियम ची रक्कम केवळ वार्षिक रू.४३६ आहे आणि विमा धारकाच्या बँक खात्यातून स्वयं-डेबिट सुविधेने डेबिट केली जाते. इन्शुअर व्यक्तीला ऑटो-डेबिट सुविधा मंजूर करावी लागते जेणेकरुन जेव्हा कव्हरेज सुरू होते. आणि जेव्हा नूतनीकरण केले जाते तेव्हा देखील प्रीमियम डेबिट केला जाऊ शकतो. ऑटो-डेबिटची मंजूरी १ जूनपूर्वी देण्यात यावी जेणेकरुन १ जूनपासून कव्हरेज सुरू होईल आणि संपूर्ण वर्षासाठी चालविले जावे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना या सर्व सामाजिक सुरक्षा योजना या शासकीय योजना असून त्या राष्ट्रीयकृत बँके तर्फे राबविण्यात येतात. या मुळे सदर व्यक्ती च्या कुटुंबांना मृत्यूपश्चात विमा योजनेत लाभ होतो.सदर योजनेचा जास्तीत जास्त खाते धारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
– श्री. शिवाजी सर्जे*
*मुख्य व्यवस्थापक*
*बँक ऑफ बडोदा*
*कागल शाखा*