जिल्हा परिषदेची अनुकंपा तत्वावर नियुक्तीची ज्येष्ठता यादी प्रसिध्द

हरकती असल्यास 8 फेब्रुवारीपर्यंत पुर्तता करावी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत गट क व गट ड मधील सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा योजनेखाली नोकरी मिळण्यासाठी केलेल्या अर्जांची सन 2022 अखेरची संभाव्य ज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेने तयार केली आहे. यामध्ये उमेदवारांचे जानेवारी ते डिसेंबर 2022 अखेर एकूण 44 व त्यापुर्वीचे एकूण 95 असे एकूण 139 उमेदवारांचे अर्ज सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर कडे नियुक्ती करिता प्रलंबित आहेत.

Advertisements

ही यादी जिल्हा परिषदेच्या www.zpkolhapur.gov.in या संकेतस्थळावर दि. 1 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मनिषा देसाई यांनी दिली. या यादीमध्ये पूर्ण अर्ज, अपूर्ण अर्ज व निकाली काढलेले अर्ज असे स्वतंत्रपणे दर्शविण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज सादर केले आहेत, त्यांची नावे ज्येष्ठता यादीमध्ये समाविष्ठ केली आहेत.

Advertisements
[ays_poll id=”7″]

या यादीवर काही हरकती, दुरुस्ती असल्यास तसेच ज्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत, अशांनी या बाबतची पुर्तता दि. 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे समक्ष उपस्थित राहून करावयाची आहे. मुदतीनंतर आलेल्या हरकती, दुरुस्ती यांचा विचार केला जाणार नाही, असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती देसाई यांनी कळविले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!