किरकोळ कारणावरून तरुणास चाकूने भोसकले

तरूण गंभीर जखमी

मुरगूड ( शशी दरेकर ) : चिमगाव ता – कागल येथे गावातून मोठ्या आवाजात मोटरसायकल फिरवल्याचे व नाव  सांगितल्याच्या कारणावरून तरुणास चाकूने भोसकून गंभीर जखमी केले आहे. यामध्ये अजिंक्य भरत एकल (वय ३३ ) हा तरूण गंभीर जखमी असून मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सीपीआर मध्ये दाखल केले आहे. याबाबत संशयित आरोपी स्वप्नील संजय करडे (वय १८ ) व संजय यशवंत करडे या बापलेकावर मुरगूड पोलीसात गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

Advertisements
https://gahininathsamachar.com/category/e-peper/

            मुरगूड पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की काही दिवसापासून स्वप्नील संजय करडे हा गावातून मोठ्या आवाजात मोटरसायकल फिरवत होता . ही माहिती अजिंक्य भरत एकल यांनी सांगितल्याच्या रागातून संशयित आरोपी संजय करडे याने शिवीगाळ करून पाठीमागून जोरात दाबून धरले व स्वप्नील करडे याने अजिंक्य एकलच्या पोटाच्या डाव्या बाजूस चाकूने भोसकले  व गंभीर जखमी केले जखमीस कोल्हापूरच्या सीपीआर मध्ये उपचार सुरू आहेत घटनेची नोंद मुरगूड पोलीसात झाली असून अधिक तपास सपोनि शिवाजी करे करीत आहेत.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!