महिला लोकशाही दिन सोमवारी

कोल्हापूर, दि. 18 : माहे ऑगस्टचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली आहे.

Advertisements

जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरील महिला लोकशाही दिन तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राहिल. तसेच जिल्हा स्तरावरील महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी, मुख्यालय, या ठिकाणी असणार आहे.

Advertisements

या लोकशाही दिनास महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात. तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक तक्रारींचे अर्ज स्व‍िकारले जाणार नाहीत, असे आवाहनही श्रीमती पाटील यांनी केले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!