वंदुर येथील अपघातात महिला ठार

कागल / प्रतिनिधी – वंदूर तालुका कागल येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या महिलेवर कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना ती मयत झाली. लता भिमराव ओतारी वय वर्षी 52 राहणार बेघर वसाहत, कागल असे मयत महिलेचे नाव आहे. अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे.

Advertisements

तारीख १ जुलै २०२३ रोजी वंदूर रोडवर अपघात होऊन मयत महिला जखमी झाली होती. तिच्यावर कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालय उपचार सुरू होते. ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबतची वर्दी लक्ष्मीपुरी (कोल्हापूर ) पोलीस ठाणे येथून कागल पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. सहाय्यक फौजदार कोंचरगी हे पुढील तपास करीत आहेत.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!