साके येथे संजयबाबा घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
व्हनाळी (सागर लोहार): साके व्हनाळी, केनवडे, गोरंबे या कोरडवाहू पांढऱ्या पट्ट्यात अन्नपूर्णा सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून डोंगर कपारीवर शेतीला पाणी उपलब्ध करून देऊन या भागाचे नंदनवन केले शिवाय परिसरात हरित क्रांती निर्माण करून शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्याचे कोटकल्याण करण्याचे काम माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले असे प्रतिपादन अन्नपूर्णा चे संचालक अशोक पाटील यांनी केले.
साके ता. कागल येथे माजी आमदार संजय घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती ज्ञानदेव पाटील, युवा नेते किरण पाटील, सरपंच सौ सुशीला पोवार होते.
यावेळी प्राथमिक शाळा व अंगणवाडी तील विद्यार्थ्यांना केळी ,बिस्किटे ,खाऊ वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मोहन गिरी, बाजीराव चौगले ,चंदर निऊंगरे, किरण पाटील , पत्रकार सागर लोहार,यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास रघुनाथ पाटील, वसंत पाटील ,ग्रामपंचायत सदस्य युवराज पाटील ,सुजय घराळ ,सातापा जाधव, राजू चौगले, पांडुरंग पोवार ,साताप्पा जाधव, रंगराव पाटील तसेच अन्नपूर्णा शुगर, अन्नपूर्णा पाणी पुरवठा संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. स्वागत यशवंत वाईंगडे यांनी केले तर आभार साताप्पा आगळे यांनी मानले.
1 thought on “संजयबाबा मुळेच शेतकऱ्यांचे कोटकल्याण : अशोक पाटील”