मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड येथील ऐतिहासिक सरपिराजीराव तलाव शनिवारी पूर्ण क्षमतेने भरलाआहे . कित्येक वर्षात पहिल्यांदाच एक महिना अगोदर भरलेल्या या तलावाच्या पाण्याचे पूजन शिवभक्तांनी केले. यावेळी मंत्रोच्चारासह विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. तसेच शहराचा जीवनसाथी असलेल्या तलावाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी भूमिपूजन, आकाश पूजन, पाणी पूजन करण्यात आले. त्यानंतर तलावास पुष्प आणि जल अर्पण करून आरती करण्यात आली.
या पूजेचे पौरोहित्य महादेव वागवेकर यांनी केले. शिवभक्तांनी या तलावास पाणीपुरवठा करणाऱ्या ओढ्याची स्वच्छता करून अडथळे काढून टाकले होते .. यामुळे तलावास स्वच्छ पाण्याचा पुरवठा झाला आहे. याबद्दल परिसरातून या तरुणांचे कौतुक होत आहे.

दरवर्षी शिवभक्तांमार्फत तलावाच्या परिसराची आणि ओढ्यांची स्वच्छता करण्यात येते .त्याचबरोबर तलावाच्या सांडव्यातून जिथून पाणी बाहेर पडते त्या ठिकाणी पाणी निघून गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात निसरड होते. तेथील शेवाळ काढून टाकण्याचे काम देखील शिवभक्त दरवर्षी करत असतात.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तलावाच्या पाणी पूजनाचा उपक्रम घेण्यात आला .ही पूजा समस्त मुरगूड तथा शिंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली व कृतज्ञता देखील व्यक्त करण्यात आली. यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट,ओंकार पोतदार, तानाजी भराडे, शिवाजी चौगुले, विनायक मेटकर, संकेत शहा, आनंदा रामाने, समरजीत खराडे, सुभाष अनावकर, प्रफुल कांबळे यांच्यासह शिवभक्त व नागरिक उपस्थित होते.
Somebody essentially help to make significantly articles Id state This is the first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to make this actual post incredible Fantastic job