मडिलगे(जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता नुकतीच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली अकरा सदस्य संख्या असलेल्या सभागृहात यावेळी महिला राज पहावयास मिळणार आहे चार प्रभागात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून शासन आदेशानुसार पहिल्यांदाच राजकीय ओबीसी आरक्षणाशिवाय अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी एक जागा सोडल्यास बाकी दहा जागा ह्या सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.
यामध्ये सहा जागा ह्या खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी तर चार जागा ह्या पुरुष खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत प्रभाग रचना अशी…… प्रभाग क्रमांक 1.. एकूण सदस्य संख्या.. 3.. अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग… पुरुष 1, सर्वसाधारण खुला प्रवर्ग पुरुष..1, सर्वसाधारण खुला प्रवर्ग महिला..1… प्रभाग क्रमांक 2.. एकूण सदस्य संख्या..3, सर्वसाधारण खुला प्रवर्ग पुरुष..1, सर्वसाधारण खुला प्रवर्ग महिला..2,.. प्रभाग क्रमांक 3.. एकूण सदस्य संख्या 2.. सर्वसाधारण खुला प्रवर्ग पुरुष..1, सर्वसाधारण खुला प्रवर्ग महिला 1,.. प्रभाग क्रमांक 4.. एकूण सदस्य संख्या..3.. सर्वसाधारण खुला प्रवर्ग पुरुष..1, सर्वसाधारण खुला प्रवर्ग महिला 2………… अशी असणार आहे.
पंचायत समितीचे स्थायी समिती बांधकाम अभियंता संदीप कांबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या आरक्षण सोडती वेळी सरपंच सौ जयश्री कुरडे ,उपसरपंच सौ जयश्री जठार , ग्रामसेवक तानाजी शिंदे, तलाठी केएम जरग, सचिव दयानंद कांबळे, पोलिस पाटील दत्तात्रय घाटगे, दिलीप कुरडे, किरण कुरडे, माजी सभापती बापूसाहेब आरडे, कामगार सेलचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, कृष्णात जठार, ग्रामपंचायतीचे विद्यमान व माजी सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते