५० हजाराची रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या विनायक ढेंगे यांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड ता. कागल येथिल राणाप्रताप चौकातील संतोष हाटेलमध्ये सुभाष नाईकवडी यांचे सापडलेले ५० हजार रुपये व ठेवपावत्या हॉटेल मालक विनायक ढेंगे यानीं प्रामाणिकपणे परत केली.

Advertisements

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात असा प्रामाणिकपणा विरळच ..!

या प्रामाणिकपणाचे कौतूक पत्रकार महादेव कानकेकर यानीं केले. यावेळी कानकेकर म्हणाले विनायक ढेंगे यानी दाखविलेला प्रामाणिकपणा हा  आदर्शवत आहे. हा प्रामाणिकपणा आनंद, विश्वास आणि सन्मान याच्यामुळे समाजात त्यांची चांगली प्रतिमा निर्माण करेल. या  याच्या प्रामाणिक कृतीमुळे त्यानां मिळणारा आनंद आणि समाधान खूप मोठे आहे.

यावेळी महादेव कानकेकर यांच्या हस्ते विनायक ढेंगे यांचा सत्कार करुन गौरवण्यात आले. याप्रसंगी विजय खराडे, बाळासो शिंदे उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!