विद्यामंदिर कुंभारगेट यमगे, विज्ञान प्रदर्शनात कागल तालुक्यात द्वितीय

मुरगूड ( शशी दरेकर )

बिद्री तालुका कागल येथे पार पडलेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यामंदिर कुंभारगेट यमगे, ता. कागल या शाळेने सादर केलेल्या घरच्या घरी सेंद्रिय खत बनवण्याचे  मोबाईल यंत्र या उपकरणास १ ली ते ५ वी या लहान गटातमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.

रासायनिक शेतीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या, पारंपरिक खत बनवण्यासाठी येणारी जागेची समस्या यावर उपाय म्हणून घरोघरी सेंद्रिय खत बनवून त्याचा वापर व्हावा,ही काळाची गरज ओळखून कुमारी देविका विनोद पाटील व कस्तुरी इंद्रजीत पाटील  या इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी या उपकरणाची  अगदी अल्प खर्चात घरच्या घरी निर्मिती केली. त्यांना वर्गशिक्षक श्री विशाल रमेश यादव यांचे मार्गदर्शन, गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे मॅडम, विस्तार अधिकारी श्री. आर्. एस्. गावडे, केंद्रप्रमुख श्री. संजय कुर्डूकर यांची प्रेरणा तर शाळेचे मुख्याध्यापक श्री हरिश्चंद्र बापूसाहेब साळोखे व शालेय व्यवस्थापन समिती यांचे विशेष सहकार्य लाभले.इयत्ता चौथी पर्यंतच्या लहान शाळेने प्राप्त केलेल्या या यशामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!