मुरगूड ( प्रतिनिधी )
मुरगुड तालुका कागल येथील पशुवैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना मुरगुडचे डॉ. राजन नाईक यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन झाले.
मुरगूड परिसरातील शेतकरी व पशुपालक यांचे आधारवड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक तरुण शिकाऊ डॉक्टर घडवून त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. त्यांच्या दरम्यान पशुसंवर्धन विभागाच्या दिनांक ३१ -१२- २०२५ रोजी देण्यात आलेल्या पदोन्नती आदेशामध्ये डॉक्टर राजन नाईक यांची सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या पदी पदोन्नती आदेश कार्यालयाला प्राप्त झाले. त्यांचे मृत्यू दिवशी पदोन्नती आदेश प्राप्त झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.
पाश्चात्य पत्नी दोन मुली, आई, आसा परिवार आहे. उत्तर कार्य न्हावेली ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग येथील घरी दिनांक १०/१/२०२६ रोजी होणार आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजन नाईक यांचे निधन
Advertisements
AD1