मुरगूडच्या “आत्मरूप” गणेश मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्य विविध कार्यक्रम

मुरगूड ( शशी दरेकर )

नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ प्रणित श्री आत्मरूप गणेश मंदिर मुरगूड येथे गणेश जयंती व ३० व्या वर्धापन दिनानिमित्त खालील कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

बुधवार दिनांक २१/०१/२०२६ इ.रोजी सकाळी १०:०० वाजता  रक्तदान शिबिराचे आयोजन श्री वैभवलक्ष्मी ब्लड सेंटर कोल्हापूर. यावेळी प्रत्येक रक्त रक्तदात्यास मोफत प्रवासी बॅग.
व दुपारी ४:०० वाजता हळदी कुंकू समारंभ , स्थळ श्री आत्मरूप गणेश मंदिर, गुरुवार दिनांक २२/०१/२०२६ सकाळी ८:०० वाजता श्रींचा पालखी सोहळा तसेच ज्ञानोबा तुकोबा अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था तुरंबे यांचा दिंडी सोहळा.

दुपारी १२:०० वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा व आरती
रात्री ८:०० वाजता संत मीराबाई भजनी मंडळ शिंदेवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक २३/०१/२०२६ सकाळी होम व हवन दुपारी १२:०० वाजता श्रींची महाआरती व महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले  असून सर्व भाविक भक्तांनी  याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ यानीं केले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!