
उपक्रम क्रमांक १. रंगीबेरंगी राख्या तयार करणे. यामध्ये विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनी वेगवेगळ्या प्रकारच्या विविध रंगाच्या राख्या बनवण्याची कला व प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये शाळेतील महिला शिक्षिका व शिक्षक व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने व उत्स्फूर्तपणे राख्या बनवणे बनवल्या.

उपक्रम क्रमांक 2. एक राखी पेड के नाम उपक्रम शाळेतील विद्यार्थिनी सर्व शिक्षिका यांनी शाळेमधील वडाच्या झाडाला राखी बांधली व वनांचे वनस्पतींचे झाडांचे संवर्धन करणे व वृक्षारोपण करणे याबद्दल प्रतिज्ञा झाडाला राखी बांधून घेतली. हा नावीन्यपूर्ण उपक्रम शाळेमध्ये पालकांनी व विद्यार्थ्यांनी झाडांची वृक्षांची काळजी घेणे व त्यांचे संगोपन करणे हा संदेश देणारा भागात नवीन उपक्रम ठरला.


उपक्रम क्रमांक ३. रक्षाबंधन कार्यक्रम यामध्ये रक्षाबंधन या दिनी शाळेतील सर्व विद्यार्थिनीनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना उपक्रमांमध्ये तयार केलेल्या राख्या बांधल्या या सर्व विद्यार्थ्यांना वही. पेन. सिस पेन्सिल अशा पद्धतीने चे ओवाळणी बहिणींना दिली. विद्यार्थिनी बहिणभावाच्या नात्याच्या ऋणानुबंधनाची शाळेमध्ये आठवण करून दिली. या कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.