बामणी येथे विना परवाना मद्य साठा पकडला

कागल : बामणी गावाजवळ बामणी फाटा येथे विना परवाना मद्य साठा जप्त करून संबधितावर कारवाई करण्यात आली. बामणी येथील राजाराम दगडू हातकर (वय ३६) मोटारसायकल ने जाता असताना डायल ११२ वाहनाने बामणी फाटा येथे नाकाबंदी करताना हातकर ऑक्टिव्हा ( एमएच – ०९ – एफआर – २६५५) गाडी घेऊन येथे आले असता गाडी न थांबवता जाण्याचा प्रयत्न केला असता.

Advertisements

पोलिसांना त्याच्या संशय आला आणि गाडी अडवून तपास केला असता काळ्या रंगाच्या सॅक व बॉक्समधून १७,७४० रु किमतीची वेगवेगळ्या प्रकारच्या दारूच्या बाटल्या सापडल्या. हा माल बेकायदा बिगर परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने धेऊन जात होता. यावेळी त्याचा मोबिल व गाडी हि जप्त करण्यात आली. कागल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक श्री.औताडे करीत आहेत

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!