कागल / विक्रांत कोरे : कागल एसटी आगाराचे चालकाला अज्ञात तरुणाने मारले थोबाडीत. तरुणाने केले पलायन. चालक -वाहक यांनी गाठले कागल पोलीस ठाणे. जालिंदर सिताराम जाधव वय वर्षे 48 राहणार कदमवाडी कोल्हापूर असे चालकाचे नाव आहे.
चालक जाधव हे निपाणी-कागल- रंकाळा. या मार्गावर बस घेऊन जात होते . एम एच- 06- 81 30 हा या बसचा क्रमांक आहे.सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी ही बस कागल बस स्थानकात आली. एसटीच्या पाठोपाठ एक तरुण जुपिटर मोपेड वरून आला .त्याने आपली मोपेड एसटी बस जवळ थांबवली आणि तो बस चालकाशी वाद घालू लागला. वाद घालता -घालता तो तरुण चाकावरून वरती चालकाच्या सीट पर्यंत पोहोचला.
त्याने क्षणात चालकाच्या दोन थोबाडीत लगावली. मात्र अज्ञात तरुणाने थोबाडीत मारण्याचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे. दरम्यान चालक व वाहक यांनी कागल पोलीस ठाणे गाठले. घडलेली हकीगत ठाण अंमलदार यांना सांगितली. सदर तरुणाच्या मोपेडचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला आहे. ते त्याचा शोध घेत आहेत. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत कागल पोलीस ठाण्यात झालेली नव्हती.