मुरगूड ( शशी दरेकर ) : सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती एकता दिवस म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. यानिमित्य मुरगुड पोलीस स्टेशन यांच्या वतीने एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियावरून आवाहन करण्यात आल्यामुळे एकता दौडबद्दल उत्साह निर्माण करण्यात झाला होता. सकाळी ७ वाजता दौड ला सुरुवात झाली.
प्रारंभी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी एकता दौड चे महत्त्व विशद केले. ते म्हणाले एकता दौड म्हणजे सामाजिक एकता, बंधुता आणि सलोखा वाढावा यासाठी या दौड चा उद्देश समाजात सर्वधर्म समभाव निर्माण करणे आणि सर्वानी एकत्र येऊन देशासाठी व धर्मासाठी कार्य करण्यास प्रेरीत करणे हा हेतू असल्याचे त्यानीं सांगितले.

यानंतर मुरगूड पोलिस ठाणे – तुकाराम चौक – शिवतीर्थ मुरगुड – मुरगुड नाका नंबर १- नवी पेठ – राणा प्रताप चौक – राजीव गांधी चौक – परत मुरगुड पोलीस ठाणे या मार्गावरून एकता दौड घेण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेऊन एकता दौड ची सांगता करण्यात आली. या दौड मध्ये तब्बल ५०० हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता या दौड मुळे शहरातील रस्ते फुलून गेले होते.
शेवटी सहाय्यक फौजदार प्रशांत गोजारी यांनी आभार मानले .यावेळी पोलीस पाटील संघटना कागल अध्यक्ष अप्पासो पवार, सर्जेराव भाट, बळीराजा अकॅडमीचे संस्थापक अजित पाटील,ओंकार पोतदार, शेलार अकॅडमीचे सुनील शेलार, विनर अकॅडमी चे अक्षय गोरुले, वस्ताद पांडुरंग पुजारी यांच्यासह मुरगूड पोलिस स्टेशन कर्मचारी, पोलीस पाटील, बळीराजा अकॅडमी, विनर अकॅडमी, सुनील शेलार फाउंडेशन चे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिवभक्त संघटना मुरगुड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने या एकता दौड मध्ये सहभागी झाले होते.