कागलच्या श्लोक पाटील यांच्या दोन चित्रांची राष्ट्रीय स्तरावरील चित्र प्रदर्शनात निवड

कागल : कागलमधील  श्लोक दिपक पाटील यांच्या दोन चित्रांची राष्ट्रीय स्तरावरील चित्र प्रदर्शनामध्ये निवड झाली आहे. मनिकर्णिका आर्ट गॅलरीतर्फे आयोजित ६९ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनामध्ये त्यांच्या चित्रांची निवड झाली. देशभरातील स्पर्धकांमधून फक्त ४७ स्पर्धकांची निवड झाली, त्यामध्ये श्लोक पाटील यांच्या दोन चित्रांचा समावेश आहे.

Advertisements

मनिकर्णिका आर्ट गॅलरी गेल्या पाच वर्षांपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चित्रकला प्रदर्शन भरवते. प्रसिद्ध चित्रकार आणि गॅलरीच्या संस्थापिका कामिनी बघेल यांनी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी या आर्ट गॅलरीची स्थापना केली आहे.

Advertisements

श्लोक पाटील हा दूधगंगा विद्यालया धरणग्रस्त वसाहत कागलचा विद्यार्थी असून तो इयत्ता सहावीमध्ये शिकतो. शाळेतील शिक्षक आणि आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्याला हे यश मिळाले आहे. हे प्रदर्शन ‘मनिकर्णिका आर्ट गॅलरी’ या फेसबुक पेजवर २३ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत ऑनलाइन पाहता येणार आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!