कागल मधील दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवले

कागल /प्रतिनिधी : कागल येथून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याची तक्रार कागल पोलिसात नोंदविण्यात आले आहे. येथील नर्मदा अपार्टमेंट, दावणे गल्ली,  घरकुल, कागल येथील विद्या बसवानी पाटील यांनी कागल पोलिसात धाव घेतली आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. एकाच वेळी, एकाच ठिकाणाहून, समान वय असणाऱ्या दोन मुली गायब झाल्याने कागल पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

Advertisements

           पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋतुजा बसवानी पाटील वय -15 वर्ष 11 महिने, ही अंगाने सडपातळ असून रंग सावळा आहे. नाक सरळ आहे. चेहरा उभट, लांब केस, उंची पाच फूट एक इंच ,शिक्षण- दहावी असे वर्णन आहे. सानिका शशिकांत पाटील वय 15 वर्षे 11 महिने रंग गोरा, नाक बुटके, गोल चेहरा, केस काळे, उंची पाच फूट दोन इंच, शिक्षण- दहावी असे हिचे वर्णन आहे. या वर्णनाच्या मुली दिसल्यास कागल पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसातून करण्यात आले आहे.

Advertisements

            या दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळून नेले आहे. हा प्रकार तारीख 2 जून रात्री १० वाजता घडला आहे.  पोलिसांनी तपास गतिमान केला आहे. पोलिसांसमोर जणू हे एक आव्हानच  आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार हे करीत आहेत.

Advertisements

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!