मुरगूड ( शशी दरेकर )
मुरगूड पोलीस स्टेशनला शिवभक्त व नागरीकांचे निवेदन …

फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येस कारणीभूत पीएसआय गोपाळ बदणे आणि प्रशांत बनकर यानां फाशी द्या या मागणीचे निवेदन आज शिवभक्त आणि मुरगुड ग्रामस्थांनी मुरगुड पोलीस स्टेशन येथे दिले.
फलटण येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या हातावर मजकूर लिहून आत्महत्या केली या मजकुरामध्ये पीएसआय गोपाळ बदने याने शारीरिक अत्याचार आणि प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ केल्याचा मजकूर लिहून आत्महत्या केली .गरीब कुटुंबातून पुढे येत डॉक्टरकीचे शिक्षण घेऊन गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे स्वप्न या नराधमांच्या कृत्यामुळे धुळीस मिळाले आहे .यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे या नरधमांना फासी व्हावी या मागणीसाठी मुरगुड मधील शिवभक्त मुरगुडकर आणि शहर नागरिक यांनी मुरगूड पोलीस स्टेशन येथे एकत्र येत यासंबंधी निवेदन दिले .
यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असतानाही तरुणांनी एकत्र येत या नराधमान विरुद्ध संताप व्यक्त केला त्याचबरोबर आमची मागणी वरिष्ठांपर्यंत कळवून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. बदने याच्या या कृत्यामुळे खाकी बदनाम होत आहे त्यामुळे त्याला फाशी द्या अशी संतापाची भावना नागरिकांनी व्यक्त केली यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, धनंजय सूर्यवंशी,आनंदा रामाने, शिवाजी चौगले, तानाजी भराडे, जगदीश गुरव, रघुनाथ बोडके, बाळासाहेब भराडे, नामदेव भराडे, प्रकाश पारिषवाड,रोहित मोरबाळे, विकी साळोखे, पृथ्वीराज चव्हाण, संकेत शहा, सुनील पाटील,चंद्रकांत हळदकर, शुभम जाधव, परशराम इंदलकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.