मुरगूड ( शशी दरेकर ) – बहिण -भावाच्या अतूट नात्यातून विश्वशांतीची प्रेरणा मिळते, मनातील वाईट विचार, विकार यानां तिलांजली देऊन शुध्द व चांगले विचार आत्मसात करण्याची गरज आहे असे प्रतिपादन त्यानी केले.
मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात राखी पौर्णिमेनिमित्य रक्षाबंधनाच्या व भावबंधनाच्या कार्यक्रमात लता बहेनजी बोलत होत्या.
प्रथम संघाचे संचालक महादेव वागवेकर यानीं सर्वांचे स्वागत केले . संघाचे उपाध्यक्ष पी. डी. मगदूम यानी पाहुण्यानां गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. त्यानंतर संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे यानी प्रास्ताविक केले.
यावेळी श्रीमती लताबेहनजी यानीं उपस्थित सर्व जेष्ठानां राख्या बांधून बहीण भावांचे नाते अतूट केले. या रक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ नागरीक संघाचे सर्व संचालक, सभासद तसेच ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाचे सहकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
शेवटी संचालक अशोक डवरी यानीं सर्वांचे आभार मानले.