स्पर्धैत अजिक्य ठरणाऱ्या संघाला १ लाखाचे रोख बक्षीस
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडात पहिल्यांदाच होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेसाठीची तयारी पूर्ण झाली असून मुरगूडसह परिसराला या स्पर्धेविषयी प्रचंड औत्सुक्य निर्माण झाले आहे. कन्या शाळेच्या पटांगणावर या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षागॅलरी तयार करण्यात आली आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन उत्साहात या स्पर्धा पार पाडण्यासाठी संयोजन कमिटी रात्रंदिवस कष्ट उपसत आहे.
उद्या रविवार दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वा. मंडलिक प्रेमी शिवसेनेच्या वतीने या स्पर्धा होत असून मुरगूडात प्रथमच दहीहंडी स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

स्पर्धेतील अजिंक्य ठरणाऱ्या संघाला १ लाख रूपयांचे रोख बक्षिस मिळणार आहे. सहभागी प्रत्येक गोविंदा पथकावर प्रोत्साहनपर अन्य बक्षिसांचाही वर्षाव होणार आहे. पहिल्याच प्रयत्नात सहा थर लावून सलामी देणा-या गोविंदा पथकाला ११ हजार रूपयाचे पारितोषीक देण्यात येणार आहे. हे बक्षिस पटकावण्यासाठी गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून अनेक गोविंदा पथके स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
माजी खासदार संजय मंडलिक व पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरिक्षक विरेंद्र मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पड़णार आहे. आरोग्य मंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षिरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयश्रीताई जाधव, सत्यजित उर्फ नाना कदम व शारंगधर देशमुख, सुजीत चव्हाण यांच्यासह जिल्यातील शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेच्या नियोजनासाठी अरुण मेंडके, देवेन राऊत, मनोज ढोबळे, धीरज सातवेकर, महेश ओतारी, संग्राम डवरी, कृष्णात पोवार, पंकज मेंडके, अनिकेत बेनके, विशाल कांबळे, संग्राम भोसले, सुखदेव पाटील, पुरुषोत्तम देसाई, प्रशांत सिद्धेश्वर, अजिंक्य अर्जुने श्रावण कळांद्रे, जया सूर्यवंशी, सुरेश परीट, पृथ्वीराज आस्वले हे संयोजन कमिटीचे सदस्य कष्ट घेत आहेत.