गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : सौ. अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव येथे शनिवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘क्रिडा महोत्सवाचा’ उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील (५ मराठा बटालियन, एन.सी.सी. ऑफिसर, कोल्हापूर), विलास पाटील सर (सेवानिवृत्त उप-प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, पलूस) आणि चंद्रकांत डावरे लोकनियुक्त सरपंच, गोकुळ शिरगाव हे उपस्थित होते.
याप्रसंगी विलास घोडसे सर, प्रकाश तारदाले सर, सुनील पाटील सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.

या सोहळ्याला संस्थेचे माननीय संस्थापक के. डी. पाटील सर, प्रिन्सिपल शतेजस पाटील सर, व्हाईस प्रिन्सिपल एन. बी. केसरकर मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका एस. के. पाटील मॅडम, सर्व समित्यांचे पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली. एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध चित्तथरारक आणि कलात्मक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये विविध कवायत प्रकार, लाठी-काठी, झांज, लेझीम, एरोबिक्स, बॉल डान्स, योगासने, डंबेल्स, ओढणी डान्स, पिरॅमिड, स्केटिंग, कराटे इत्यादींचा समावेश होता.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. विलास घोडसे सरांनी मुलांना प्रोत्साहन दिले. विलास पाटील सरांनी विद्यार्थ्यांना शाळेतील शिस्त आणि त्याचे महत्त्व याबद्दल माहिती दिली. प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील सरांनी मुलांना जीवनातील यशासाठी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला केसरकर मॅडम यांनी केले. संस्थेचे संस्थापक के. डी. पाटील सरांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची उत्साहात सांगता केली.