कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात उद्भवलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानी साठी राज्य शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 17 कोटी 42 लाख 5 हजार इतका निधी पूरबाधित नागरिकांना आगाऊ मदत देण्यासाठी प्राप्त झाला आहे. तसेच लवकरच प्राप्त होणारा निधी टप्प्या-टप्प्याने बाधितांना वितरीत करण्यात येणार आहे.
पूरामुळे जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. पूरबाधित नागरिकांना मदत मिळावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रयत्न केले. या प्रयत्नामुळे जिल्ह्याला 17 कोटी 42 लाख 5 हजार इतका निधी प्राप्त झाला आहे. त्या-त्या तालुक्यातील बाधित नागरिकांना मदत देण्यासाठी हा निधी संबंधित तहसिलदार यांना वितरीत करण्यात येणार आहे.
आर्थिक मदत देण्यात येणारे तालुके पुढीलप्रमाणे-(रक्कम लाखांमध्ये) करवीर-640, गगनबावडा-7.50, आजरा-2.20, शाहूवाडी-37.35, पन्हाळा-78.575, राधानगरी-5.75, भुदरगड-10.20, चंदगड-10.275, गडहिंग्लज-47.95, कागल-60.525, शिरोळ-507.85, हातकणंगले-133.675, अपर तहसिलदार इचलकरंजी-200.2 अशी एकूण 17 कोटी 42 लाख 5 हजार येवढी मदत सानुग्रह अनुदान म्हणून बाधितांना देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात मिळून सुमारे 69 हजार 682 कुटुंबे बाधित झाली आहेत. यापैकी करवीर तालुक्यात ग्रामीण 10 हजार 935 व शहर 14 हजार 665 अशी सुमारे 25 हजार 600 कुटुंबे, गगनबावडा(ग्रामीण) -300, आजरा (ग्रामीण) -88, शाहूवाडी (ग्रामीण)-1 हजार 494, पन्हाळा (ग्रामीण)-3 हजार 143, राधानगरी (ग्रामीण)-230, भुदरगड (ग्रामीण)-408, चंदगड (ग्रामीण)-411, गडहिंग्लज ग्रामीण 1 हजार 542 व शहर 376 अशी 1 हजार 918 कुटुंबे, कागल ग्रामीण 2 हजार 206 व शहर 215 अशी -2 हजार 421 कुटुंबे, शिरोळ ग्रामीण 16 हजार 361 व शहर 3 हजार 953 अशी एकूण -20 हजार 314 कुटुंबे, हातकणंगले (ग्रामीण)-5 हजार 347 तर अपर तहसिलदार इचलकरंजी येथे ग्रामीण 3 हजार 32 व शहर 4 हजार 976 अशा 8 हजार 8 एवढ्या कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार लवकरच हा निधी संबंधितांना वितरीत करण्यात येईल.