माजी खासदार संजय मंडलिक, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजीतसिंह घाटगे प्रमुख उपस्थित
मुरगूड ( शशी दरेकर ) : ४० वर्षाची प्रतीक्षा, कसोटी व संघर्षाचे अनेक क्षण पाठीशी बांधत असंख्य दातृत्वाच्या हातांनी मुरगूड शहर पत्रकार संघाच्या नव्या वास्तूचे स्वप्न अखेर साकार झाले. जिल्ह्यासह तालुक्यातील मातब्बर राजकीय नेते, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, राजकीय, विविध क्षेत्रातील सामाजिक संस्था, संघटना पत्रकारीतेवर प्रेम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये मुरगूड शहर पत्रकार संघाच्या नव्या वास्तूचा प्रवेश सोहळा आज दिमाखात साजरा झाला.

माजी खासदार संजय मंडलिक आणि शाहू उद्योग समूहाचे प्रमुख समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी संजय मंडलिक म्हणाले, मुरगुड आणि परिसराच्या विकासाच्या सर्व परिकल्पनेत मुरगुड शहरातील पत्रकारांचे खूप मोठे योगदान राहिले आहे.पत्रकारीता क्षेत्रात काम करणारे पत्रकार विविध सामाजिक संघटनांशी संबंधित असल्याने समाज विकासाचे प्रतिबिंबच त्यांच्या लेखणीतून साकारले आहे. पत्रकार संघाच्या नूतन वास्तूच्या निमित्ताने ग्रामीण भागात महाराष्ट्रातील हे एकमेव कार्यालय असावेअसा विश्वास व्यक्त करत पत्रकार संघाच्या वाटचालीत सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
यावेळी समरजीत घाटगे म्हणाले, पत्रकार सातत्याने आणि सक्षमपणे समाज हितासाठी काम करत असतात. त्यांच्या निर्भिड लेखणीमुळे समाजातील अनेक प्रश्नांची सोडवणूक होते. गेली अनेक वर्ष आम्ही शाहू ग्रुपच्या माध्यमातून पत्रकारांचा सन्मान करण्याच्या उपक्रमाचे सातत्य ठेवले आहे. राजकीय नेते आणि पत्रकार यांच्यात उत्तम संवाद असल्याशिवाय समाजाची प्रगती होत नाही. मुरगुड शहर पत्रकार संघाच्या नूतन कार्यालयातून पत्रकारितेचा नवा अध्याय सुरू व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हा भाजपचे अध्यक्ष नाथाजी पाटील, ज्येष्ठ पत्रकार व्ही. आर. भोसले, दत्ता मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत उपाध्यक्ष राजू चव्हाण, प्रास्ताविक अध्यक्ष प्रा. रवींद्र शिंदे, सूत्रसंचालन अविनाश चौगले यांनी केले. मान्यवरांचा सत्कार बांधकाम समितीचे चेअरमन महादेव कानकेकर यांच्या हस्ते करण्यात आला. आभार सचिव प्रवीण सूर्यवंशी यांनी मानले.
पत्रकार भवनमध्ये शुभेच्छा देण्यासाठी प्राचार्य शाम पाटील, शशी दरेकर, सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, श्रीकांत जाधव, विजय मोरबाळे, ॲन्थोनी बारदेस्कर यांच्यासह रणजितसिंह पाटील, शिक्षण उपसंचालक डॉ. जी. बी. कमळकर, नवाज मुश्रीफ, बाजीराव गोधडे, अमरसिंह घोरपडे, डाॅ. शिवाजी होडगे, सपोनि शिवाजी करे, समाधान हावळ, अनंत फर्नांडिस, जॉन्सन बारदेस्कर, केशव पाटील, दत्तामामा खराडे, नवाज मुश्रीफ, धीरज सावर्डेकर, नामदेवराव मेंडके, विशाल सुर्यवंशी, प्रा. चंद्रकांत जाधव, जयसिंग भोसले, धोंडीराम मकानदार, जीवन साळोखे, चंद्रकांत माळवदे, किरण गवाणकर, प्रशांत शहा ,समाधान हावळ, जोतीराम सुर्यवंशी, विजय भोसले, अभिजीत भोसले, अमर चौगले, दगडू शेणवी, डॉ. टी. एम. पाटील, डॉ. टी. एम. चौगले, दीपक शिंदे, नगरसेवक सुहास खराडे, सुनील रणवरे, एस. व्ही. चौगले, सत्यजित पाटील, अनिल राऊत, दत्तात्रय मंडलिक, रणजीत भारमल, विजय राजगिरे, बजरंग सोनुले, राजेंद्र आमते, रेखाताई मांगले, नकेलीन बारदेस्कर, गीता आंगज, विजयमाला शिंदे, वैशाली गोधडे, संजीवनी कांबळे, सुरेखा लोकरे यांनी पत्रकार भवनला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
If some one needs expert view concerning running a blog after that i
recommend him/her to visit this blog, Keep up the fastidious job.