कागल प्रतिनिधी: कागल मध्ये संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली .सकाळी पादुका अभिषेक मकरंद सुर्यवंशी यांच्या हस्ते करणेत आला. संत सेना महाराज यांच्या फोटोचे पुजन कागल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रवीण काळबर यांच्या हस्ते करण्यात आले.
पंचायत समितीचे माजी सभापती रमेश तोडकर यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले .कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थानी जननायक कर्पुरी ठाकुर ओबीसी संघटनेचे कार्याध्यक्ष व संत सेना महाराज नाभिक समाज च. ट्रस्ट कागल चे अध्यक्ष अनिल ठाकूर संकपाळ हे होते.

यावेळी कागल शहर सलुन दुकान मालक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब माने, उपाध्यक्ष लखन संकपाळ, सचिव तानाजी चौगुले , कृष्णात कोरे,सचिन गवळी, शिवाजी कोरे , बाळासाहेब सुर्यवंशी, अक्षय चव्हाण ,भरत देवकर, नितीन संकपाळ, विठ्ठल साळुंखे, राजेंद्र मर्दाने ,विशाल संकपाळ, संतोष शिंदे, अभिजित सुर्यवंशी , सुधाकर माने ,मारूती संकपाळ सचिन संकपाळ, अनिकेत संकपाळ ,अमृत वाडकर ,संजय राऊत ,राकेश चव्हाण ,संजय संकपाळ ,बाळासाहेब मांडरेकर आदिंसह नाभिक समाजाचे कार्यकर्ते, व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.