१५० कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पूर्ण करणेचा व्यवस्थापकीय मंडळाचा संकल्प
मुरगूड ( शशी दरेकर ) : खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी स्थापन केलेली आणि सद्या माजी खासदार संजयदादा मंडालिक व युवानेते ॲड. वीरेंद्र मंडलिक यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली उतूंग आर्थिक भरारी घेत असलेली शहरातील सुवर्ण महोत्सवी राजर्षि शाहू नागरी सहकारी पत संस्थेची ५० वी वार्षिक सर्व साधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन दतात्रय तुकाराम तथा दत्तामामा सोनाळकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी खासदार संजयदादा मंडलिक होते.

सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. पत संस्थेचे ज्येष्ठ संचालक नेताजी तथा एन वाय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले . प्रास्ताविकात पत संस्थेने केलेल्या दैदिप्यमान प्रगतीचा आढावा घेतला. अजेंडा व इतिवृत्ताचे वाचन संस्थेचे जनरल मॅनेजर ज्ञानदेव पाटील यांनी केले. सभागृहात अजेंड्यावरील सर्व विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात आली. सर्वच्या सर्व विषय यांच्या टाळ्यांच्या गजरात मंजूर केले. सभासदांनी विचारलेले प्रश्न आणि शंकाचे समाधान सभाध्यक्ष दत्तामामा सोनाळकर, व्हाईस चेअरमन रविंद्र ढेरे, सर्व संचालक मंडळ जनरल मॅनेजर ज्ञानदेव पाटील यांनी केले.
यावेळी झालेल्या चर्चेत सभासद सर्वश्री एस . व्ही. चौगले , सखाराम सावर्डेकर नामदेव एकल मारुती रावण, रमेश किल्लेदार , शंकर इंगवले, गोपी भाट, दिगंबर परीट, आनंदा बाबूराव पाटील, राजेश गोधडे, एन्. एस्. चौगले यांनी भाग घेतला.
कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्डाची निवडणूक सलग तीन वेळा बिनविरोध आणि तिनही वेळा बिनविरोध चेअरमन झाल्याबद्दल माजी खासदार संजयदादा मंडलिकांचा यावेळी सभागृहाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत संस्थेचे सर्व माजी पदाधिकारी, अधिकारी, सर्व माजी संचालक, माजी सेवकवृंद, विविध वृतपत्रांचे आणि वृतवाहिन्यांचे प्रतिनिधींचा नागरी सत्कार करण्यात आला.
इयत्ता दहावी आणि बारावी च्या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे पहिल्या आलेल्या सभासदांच्या पाल्यांना पारितोषिक,
सन्मान चिन्ह, देवून संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले. माजी खासदार संजयदादा मंडलिक यांनी यावेळी सभागृहाला मार्गदर्शन केले, ते म्हणाले. पत सस्थेचे सभासद अत्यंत जागरूक आहेत. ठेवीदारांचा संस्थेवर दृढ विश्वास आहे. केवळ एका दिवसात एक कोटी रुपयांच्या ठेवी ठेवीदारांनी संस्थेत ठेवून व्यवस्थापकीय मंडळावरील विश्वासाची जणू पोच पावतीच दिली आहे. येत्या वर्षभरात १५० कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा संकल्प आहे. संचालक अत्यंत दक्ष आणि हिरीरीने कामकाजात सहभागी होत असतात. ऑडीट वर्ग "अ" देवून संस्थेच्या पारदर्शी कारभाराची पोच पावती संस्थेला मिळालेली आहे. सभासदांच्या अपेक्षे प्रमाणे सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सभासदाना भरीव स्वरूपत बक्षिस देण्याचा विचार आहे. संस्थेच्या वतीने सप्टेबर महिन्यात इंदूरीकर महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात घेण्यात येणार आहे
. याचा लाभ भागातील तमाम लोकांनी घ्यावा असेही ते म्हणाले
.
दत्तामामा सोनाळकर यांचे यावेळी अध्यक्षीय भाषण झाले .सभेला संचालक ॲड. वीरेंद्र मंडलिक, व्हाईस चेअरमन रविंद्र ढेरे, नेताजी पाटील, प्रदिप चव्हाण , रामचंद्र भोपळे , दतात्रय भोई , वैशाली मंडलिक , सविता कळांद्रे, सर्व शाखांचे अधिकारी कर्मचारी आणि मोठ्या संखेने सभासद हजर होते. शेवटी संचालक नारायण मुसळे यांनी आभार मानले .