११६ कोटी ठेवीचा टप्पा पार
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता कागल येथिल सर्वपरिचीत असणारी श्री ग़णेश नागरी सहकारी पतसंस्थेची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा साई आखाडा हॉलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
प्रारंभी मान्यवर सभासदांच्या हस्ते फोटो पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले .यानंतर भारतातीत आणि महाराष्ट्रातील सहकार, शिक्षण, शहिद जवान, सांस्कृतीक, साहित्य,नैसर्गिक उत्पात तसेच संस्थेचे मयत सभासद यानां श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थित सभासद बधूभगिनींने स्वागत सभापती श्री . सुखदेव येरुडकर यानीं करुन संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा संक्षिप्त आढावा घेतला. सभेत १०वी१२वीच्या गुणवत्ताधारक पाल्यानां संचालकांच्या व मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
यावेळी बोलतानां संस्थेचे जेष्ठ संचालक श्री उदयकुमार शहा म्हणाले श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन२०२३-२४या आर्थिक वर्षात ठेवीमध्ये १६ कोटीची कोटीची भरघोस वाढ करून ११६कोटी ठेवीचा टप्पा पार करुन पतसंस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तर २ कोटी २० लाख४६ हजार इतका निव्वळ नफा मिळवून संस्था प्रगती पथावर वाटचाल करीत आहे.
यावेळी संस्थेत सध्या अनेक बँकींग सुविधा उपब्ध असुन सभासद , ठेवीदार यानीं याचा लाभ घ्यावा असे सुचित केले .
यावेळी श्री नामदेवराव मेंडके यांची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण “योजना कागल तालूका समन्वय समिती अध्यक्ष व श्री शिवाजी होडगे यांची मंडलिक महाविद्यालय़ाच्या प्राचार्य पदी निवड झाले बद्दल तसेच कु . अमृता पुजारी हिची ज्यूनिअर आशियाई स्पर्धेत देशाला कास्य पदक मिळवून दिल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
अहवाल वाचन कार्यकारी संचालक श्री राहुल शिंदे यानीं केले .
सभासदानी सभेत १ते १३ विषयानां टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजुरी दिली .परशराम डोणे , आप्पासो कांबळे , मधूकर पाटील , दिपक शिंदे , सर्जेराव पाटील , राजेश शहा यानीं चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी उपसभापती मारूती पाटील , संचालक सर्वश्री एकनाथ पोतदार, आनंद देवळे , राजाराम कुडवे , सोमनाथ यरनाळकर , आनंदा जालीमसर, प्रकाश हावळ, दत्तात्रय कांबळे, संचालिका सौ. दिपाली शहा, सौ .रेखा भोसले यांच्यासह सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साताप्पा चौगले यानी केले तर आभार संचालक सोमनाथ यरनाळकर यानीं मानले .