निढोरीत ‘ओम साई’ च्या मोदक सजावट स्पर्धेत तनुजा, दुर्गेशा, माधूरी ठरल्या विजेत्या

मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी ता. कागल येथील ओम- साई कला, क्रीडा, सांस्कृतिक युवा मंच प्रणित सुवर्ण गणेश मंदिर (गोल्डन टेम्पल )मार्फत घेण्यात आलेल्या अनोख्या मोदक बनवण्याच्या स्पर्धेत सौ. तनुजा विनायक सुतार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक सौ. दुर्गेशा विशाल पाटील आणि तृतीय क्रमांक सौ. माधुरी अमित सुतार यांना मिळाला. उत्तेजनार्थ बक्षिसाच्या मानकरी कु. आराध्या युवराज भाकरे व कु. आराध्या घनश्याम गोसावी ठरल्या.

Advertisements

    बक्षीस वितरण सौ. रजिता राजेंद्र सुतार, सौ वृषाली विश्वास दरेकर, डॉ. सौ. सविता सचिन मोरबाळे, सौ. जयश्री हिम्मत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेची मांडणी व नियोजन सौ. वंदना संजय सुतार व सौ. मिनाक्षी संतोष शिंदे यांनी केले. मोदक स्पर्धैतील परीक्षक म्हणून सौ. दिपा उदय शहा आणि सौ. योगिनी उदय शेटे ( मुरगूड ) यानीं काम पाहिले.

Advertisements

ओम साई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विश्वंभर पाटील यांनी स्वागत, उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक तर सुत्रसंचालन संतोष शिंदे यांनी केले. खजिनदार शशिकांत जाधव यांनी आभार मानले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!