वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा – जिल्हा व्यवस्थापक एस. आर. बडगुजर

 कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत ऑफलाईन पद्धतीने बिनव्याजी थेट कर्ज (रक्कम १ लाख रुपये) योजना २५ टक्के बीजभांडवल योजना व ऑनलाईन पद्धतीने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत असल्याची माहिती वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. आर. बडगुजर यांनी दिली आहे.

Advertisements

 जिल्हा कार्यालयातील प्राप्त कर्ज प्रस्तावातील लाभार्थीची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा लाभार्थी निवड समितीची बैठक झाली. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक (LDM), सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ व जिल्हा व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कोल्हापूर उपस्थित होते. या बैठकीत महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेतील एकूण २० कर्ज प्रस्तावांना निवड समितीकडून मान्यता देण्यात आली.

Advertisements

जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील गरजू व होतकरु व्यक्तींना महामंडळाच्या योजनांचा लाभ देण्यात आला आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील ज्या व्यक्तींना महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा व्यक्तींनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ३ रा माळा, विचारेमाळ, कावळा नाका (ताराराणी चौक) कोल्हापूर. दूरध्वनी क्र. ०२३१-२६६२३१३ येथे संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन योजनांचा लाभ घेण्यासाठी महामंडळाची वेबसाईट www.vjnt.in अर्जांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. बडगुजर यांनी केलेले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!