कोल्हापूर : जलयुक्त शिवार टप्पा-1 मधील कामे पूर्ण होवून बराच कालावधी होवून गेल्यामुळे या कामांची परिरक्षा, दुरुस्ती व देखभाल करणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामांसाठी येणारा खर्च जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान 2.0 सदस्य सचिव यांनी दिली आहे. […]