कागल शासकीय विश्रामगृहाजवळ स्विफ्टचा अपघात, एक किरकोळ जखमी

कागल (सलीम शेख ) : पुणे-दौंडहून गोव्याला पर्यटनासाठी गेलेल्या तीन जणांच्या स्विफ्ट गाडीला काल पहाटे कागल शासकीय विश्रामगृहाजवळील तीव्र वळणावर अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने गाडीतील एअरबॅग वेळेत उघडल्याने मोठी हानी टळली असून, एकजण किरकोळ जखमी झाला आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-दौंड येथील तीन मित्र गोव्याला पर्यटनासाठी गेले होते. रात्री ते पुण्याला परतत असताना कागलजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे स्विफ्ट (गाडी क्रमांक MH42-BN-6333) थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या बेरिकेटला धडकली. या धडकेमुळे गाडीचे इंजिन ऑइल रस्त्यावर पसरले. त्यानंतर वेगात असलेली गाडी पुढे जाऊन एका पुलाच्या बांधकामासाठी असलेल्या कठड्याला जोरदार धडकली.

Advertisements

अपघाताच्या वेळी गाडीतील एअरबॅग उघडल्यामुळे गाडीतील तिघांनाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, या अपघातात एकजण किरकोळ जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!