मुरगूड येथिल स्वप्नील ननवरे  “भारत गौरव सन्मान ”  पुरस्काराने सन्मानित

मुरगूड ( शशी दरेकर ): शांताई फाउंडेशन पुणे, हिरकणी महिला विकास संस्था कोरेगाव ,भीमा व विसावा मायेची सावली वृद्धाश्रम आयोजित ‘रंग श्रावणाचा गौरव ‘ समाजसेवेचा ‘ अंतर्गत भारत गौरव सन्मान सोहळा पुणे २०२५ चा “भारत गौरव सन्मान पुरस्कार” देऊन मुरगूडच्या स्वप्नील ननवरे यानां सन्मानित केले.

Advertisements

अवयव दान जनजागृती आणि मदतनीस या कार्यात सात वर्षांत समाजात अवयव दान विषयी जनजागृती करून तसेचअनेक रूग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक व मानसिक पाठबळ देण्याचे कार्य करत होते, महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील अनेक रूग्णांना नवजीवन देण्याचे कार्य तसेच दिव्यांग व मिळालेले अवयव रूपी नवजीवन समाजासाठी वापर करत समाजकार्यात स्वत:ला त्यानी झोकून घेतले आहे.

Advertisements


अभिनेते तेजस बर्वे , डॉ. बी.एन.खरात संचालक समृद्धी पब्लिकेशन व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळ्यात स्वप्नीन ननवरे यानां सन्मानित करण्यात आले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!