मुरगूड शहरातील सूर्यवंशी/मांगोरे कॉलनीतील रहिवासी गेली ३५ वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित आहे रस्ता, गटार, स्वच्छता यांसारख्या प्राथमिक सुविधांचा अभाव असून ही प्रशासनाकडे कोणतीही सुनावणी होत नसल्याने नाराज नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. “रस्ता नाही, गटर नाही, स्वच्छता नाही, विकास नाही, त्यामुळे मतदान नाही” असा बोर्ड कॉलनीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे, हा लावलेला बोर्ड ये-जा करणाऱ्या नागरिकांना लक्ष वेधून घेत आहे. मुरगूड शहरांमध्ये या निवडणुकीच्या तोंडावर बोर्डाची चर्चा रंगू लागली आहे.
कॉलनीचा रस्ता ( ५१४/ब/१, ५६५/ब/५ व ६) नगरपरिषदेकडे वर्ग असूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. मुरगूड विकास आराखड्या मध्ये या कॉलनीतून १५ मीटरचा डी पी रोड मंजूर असतानाही वर्ग करून घेतले जात नाही. सूर्यवंशी/मांगोरे कॉलनी एन. ए. असून ही कॉलनीला सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
जाणीवपूर्वक अंतदृष्टस्थ हेतू पुरस्कर दृष्टीने काम थांबवले आहे
निवडणूक २०२५ च्या मदतीने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असून, प्रशासन व जनप्रतिनिधींना इशारा दिला आहे की, समस्या सुटे पर्यंत मतदानाचा बहिष्कार कायम राहील. आता पहावे लागेल या नागरिकांची समस्या मुरगूड नगर परिषद प्रशासन व जनप्रतिनिधी सोडवतात का ? याकडे मुरगूड शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

