सुरूपली येथे पायी चालत जाणाऱ्या महिलेला वाहनाची मागून धडक बसून ठार

मुरगूड (शशी दरेकर) : सुरूपली ता. येथे महाशिवरात्रीचा महाप्रसाद घेवून घरी पायी चालत जाणाऱ्या  महिलेस टाटा मॅजीक गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने महिला ठार झाली . श्रीमती  सुवर्णा बाळासो पाटील वय ५६ रा .सुरुपली असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनेची नोंद मुरगूड पोलीसात झाली आहे.

Advertisements

      याबाबत मुरगूड पोलीसातून मिळालेली अधिक माहिती अशी सुरूपली ता. कागल येथील श्रीमती सुवर्णा बाळसो पाटील या अन्य महिलासह मुरगूड निपाणी मार्गावरील सुरुपली शेजारील महादेव मंदीर येथे महाप्रसाद घेवून घरी पायी चालत चालल्या होत्या.

Advertisements

सुरुपलीच्या यशवंतनगर जवळील स्मशानशेड जवळ आली असता मुरगूडहून मेतकेकडे चाललेल्या टाटा मॅजीक गाडी क्र . एम.एच. १० बीए ३३४०  ने त्या महिलेस पाठीमागून जोराची धडक दिली त्यावेळी ती जोराने आपटली व गंभीर जखमी झाली.

तातडीने जखमी महिलेस निपाणी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले पण उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी मुरगूड ग्रामीण रुग्णालयात करून नातेवाईकांच्या ताब्यात रात्री उशिरा देण्यात आला.

Advertisements

       या दुर्दैवी घटनेमुळे सुरुपलीवर शोककळा पसरली . मयत महिलेच्या पश्चात मुलगे , सुना नातवंडे , दिर जावू असा परिवार आहे. मयत महिलेचा एक मुलगा सैनदैलात असून तो जम्मू काश्मिर  येथून गावी आल्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले .घटनेची नोंद मुरगूड पोलीसात झाली असून अधिक तपास पोलीस हे काँ पाटील  करीत आहे

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!