पिंपळगाव खुर्द (प्रतिनिधी) : पिंपळगाव खुर्द ता कागल येथील सुनील चंद्रकांत तेलवेकर वय 28 याने राहत्या घराजवळ असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
अधिक माहिती अशी सुनील हा घरी असताना घराजवळच जनावरांचा गोठयात जनावरांना वैरण टाकतो असे सांगून गेला.बराच वेळ तो परत आला नसल्याने पाहण्यासाठी गेल्यावर जनावरांच्या गोठ्यात असणाऱ्या लोखंडी पोलला जनावरांना चारा आणण्यासाठी असणाऱ्या काळ्या दोरीने गळफास लावल्याचे निदर्शनास आले.आत्महत्या चे नेमके कारण मात्र समजू शकले नाहीय.सदर घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास कागल पोलीस करत आहेत.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!