मुरगूडमध्ये शार्टसर्किटमुळे उसाला आग

मुरगूड ( शशी दरेकर ):

मुरगूड ता. कागल येथिल मुरगूड तिट्टा रोडवरील दावत हॉटेल समोरील उसाच्या शेतामध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. शेतकऱ्यांची तप्तरता व नागरीकांच्या सहकार्याने आग लागलेल्या उसाच्या भोवतालचे ऊस कापून पुढे जाणाऱ्या आगीची वाट बंद करण्यास सुरुवात केली याच दरम्यान सदाशिवराव मंडलिक कारखाना व बिद्री कारखान्याचे बंब वेळेत आल्याने आग आटोक्यात येऊन शेकडो एकर ऊस जळून खाक होण्यापासून वाचला.
महावितरणनेही तत्परतेने भेट देऊन या ठिकाणच्या डांबावरील लाईट बंद करून घेतली.

यावेळी सुहास डेळकर, प्रशांत मेटकर, गजानन साळोखे, सुभाष निवृत्ती वंडकर, आणि सौरभ सुभाष वंडकर यांच्या ऊस शेतीचे नुकसान झाले. घटनास्थळी जमलेल्या नागरीकांनी आग विझवण्यास मदत केली. मुरगूड नगरपरिषदेचा बंब उपलब्ध असूनही ही आग विझवण्यासाठी न आलयाने नागरीकात संताप व्यक्त होत होता.

Advertisements

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!