दिड लाख मेट्रीकटन ऊस गाळप; वेळेत ऊस तोडीने शेतकरी समाधानी
व्हनाळी (सागर लोहार) :
केनवडे ता. कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता झाली. यंदा कारखान्याने दिड लाख मेट्रीक टन ऊस गाळप केले असून बैलगाडी चालकांनी मोठ्या उत्सहात वाजत गाजत मिरवणूकीने ऊसाच्या अंतीम फे-या कारखान्याकडे पोहच केल्या. दरम्यान कारखाना प्रसासनाने वेळेत सर्व बिले आदा केल्याचे समाधनही अनेकांनी बोलून दाखवले. यावेळी गळीत हंगामाच्या सांगता मिरवणूकीत अन्नपुर्णा शुगरचे संस्थापक चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे, गोकुळ चे संचालक अंबरिषसिंह घाटगे, सहभागी झाले होते.
गोकुळ चे संचालक अंबरिषसिंह घाटगे, संचालक दत्तोपंत वालावलकर ,एम बी पाटील तानाजी पाटील, विश्वास दिंडोर्ले, धनाजी गोधडे, मल्हारी पाटील, राजू भराडे वाय.टी पाटील शिवसिंग घाटगे, दिनकर पाटील ,सुभाष करंजे यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी चिफ केमिस्ट प्रकाशकुमार माने, चीफ इंजिनियर शिवाजी शेवडे, सिव्हिल इंजिनिअर एच एस पाटील, फायनान्स मॅनेजर एस एस चौगुले ,शेती अधिकारी बी.एम चौगुले, बाजीराव पाटील, विनायक वैद्य, रणजित गायकवाड, दता पाटील तसेच गोरंबे, केनवडे, साके, व्हनाळी परिसरातील बैलगाडी वाहतुकदार,तोडणी मजुर ऊसउत्पादक उपस्थित होते. स्वागत सचिन लोहार यांनी केले तर आभार के.बी. वाडकर यांनी मानले.
यंदाच्या गळीत हंगामामध्ये कारखान्याने दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले असून पुढील वर्षी अडीच लाख मेट्रिक टन गाळप करण्याचा आमचा मानस आहे. या वर्षी माझ्यावर आणि संचालक मंडळांवर विश्वास ठेवून ज्या शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस दिला त्याबद्दल त्या शेतकऱ्यांचे, वाहतूक तोडणी यंत्रणा, मजूरांचे मनःपूर्वक आभार – संजयबाबा घाटगे, ( चेअरमन : अन्नपूर्णा शुगर केनवडे)
बैलगाडीतून 830 टन ऊस वाहतुक…..
अन्नपुर्णा शुगर कारखान्याला यंदाच्या गळीत हंगामात गोरंबे ता.कागल येथील ऊसवाहतुक शेतकरी सर्जेराव गोडसे यांनी बैलगाडीतून तब्बल 830 मेट्रीक टन ऊस वाहतुक करून विक्रम नोंदवला आहे.