पहलगाम येथे झालेल्या घटनेचा मुरगूडमध्ये तीव्र निषेध

मुरगूड ( शशी दरेकर ) : काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामधील २७ जणांना जीव गमवावा लागला. या घटनेचा निषेध करण्यासाठी मुरगूड शहरातील नागरिकांनी कॅण्डल मार्च काढून निषेध केला. तसेच या घटनेत मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काश्मीरमध्ये झालेला हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणारा आणि मास्टरमाईंड असणाऱ्या पाकिस्तानचा काळा चेहरा समोर आणणारा असा ठरला आहे.

Advertisements

मुरगुड शहर नागरिकांनी शिवतीर्थ येथे कॅन्डल मार्च व निषेधासाठी जमण्याचे आवाहन केले होते . त्यानुसार संध्याकाळी सात वाजले पासून नागरिकांनी जमण्यास सुरुवात केली होती यानंतर कॅन्डल मार्चला सुरुवात झाली . हा कॅन्डल मार्च बाजारपेठ ,एसटी स्टँड मार्गे हुतात्मा तुकाराम येथे आला . यानंतर ओंकार पोतदार, संकेत भोसले , बबन बारदेसकर,दगडू शेणवी, धोंडीराम मकानदार, अनिल सिद्धेश्वर यांनी अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करून आपल्या भावना व्यक्त केल्या . तसेच या हल्ल्या मागचा मास्टरमाइंड असणाऱ्या पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या . त्यावेळी तुकाराम चौकामध्ये हजारो नागरिक उपस्थित होते . यानंतर मृतांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

Advertisements

मूक मोर्चा मध्ये सर्जेराव भाट, संतोष वंडकर, संभाजी अंगज, दत्ता मंडलिक , एस व्ही चौगुले, तानाजी भराडे, विलास भारमल, जयसिंग भोसले, दिलीप कांबळे, सोमनाथ यरनाळकर, मयूर सावर्डेकर, बजरंग सोनुले, जगन्नाथ पुजारी, राजू भाट, धनंजय सूर्यवंशी, प्रफुल,कांबळे, संग्राम ढेरे, राहुल शिंदे,अमर चौगुले, रणजीत मोरबाळे,संकेत शहा, राजू शहा, प्रकाश पारिशवाड , सुभाष अनावकर,जगदीश गुरव ,दत्ता साळुंखे,प्रशांत सिद्धेश्वर, विक्रम गोधडे,अभी मिटके,संग्राम साळोखे यांच्यासह नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते .

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!