मुरगूड ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस विभाग व अस्थिरोग (ऑर्थोपेडिक) आणि सोनोग्राफी विभाग सुरु करण्याबाबत निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस विभाग व अस्थिरोग (ऑर्थोपेडिक) आणि सोनोग्राफी विभाग सुरु करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. माजी उपनगराध्यक्ष मुरगूड नगरपरिषद दगडू तुकाराम शेणवी, यांनी आरोग्य मंत्री, मा. प्रकाश आबिटकर यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली आहे.

Advertisements

मुरगूड परिसरातील ३० ते ४० गावांतील लोकांच्या रोज ३०० ते ४०० ओपिडी  होत असते. उपचारासाठी मुरगूड ग्रामीण रुग्णालय मध्ये नागरिकाचे येणे जाणे असते आणि वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आसपासच्या अनेक गावांतील रुग्ण वैद्यकीय उपचारांसाठी मुरगूड येथील उपजिल्हा रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असतात.

Advertisements

सध्या येथील रुग्णांना मूत्रपिंड विकारांमुळे (किडनी फेल्युअर) डायलिसिससाठी कोल्हापूर किंवा कागल येथे जावे लागते, ज्यामुळे वेळ, खर्च आणि प्रवासामुळे रुग्णांची फार हालअपेष्टा होते. तसेच हाडांचे (ऑर्थोपेडिक) आजार व अपघाती रुग्णांसाठी सुसज्ज विभाग नसल्याने तातडीच्या सेवांमध्ये अडचण निर्माण होते.

Advertisements

ही तातडीची सेवा उपलब्ध झाली तर हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल व आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होईल ही सेवा मुरगूड ग्रामीण रुग्णालय मध्ये लवकरात लवकर सुरू व्हावी असे निवेदनाचे पत्र देण्यात आले.

यावेळी, रणजित भारमल, दीपक शेणवी, रतन जगताप, सुशांत पोवार, अमर इंदलकर, रणजित डोंगळे, उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!