मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी विद्यार्थ्यांकरीता हेल्पलाइन क्रमांक दिला आहे. त्याबाबत महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद ही मिळाला आहे.
आता आणखी एक पाऊल पुढे टाकत परिवहन खात्याशी संबंधित असलेल्या राज्यातील सर्व नागरिकांच्या करीता www.pratapsarnaik.com या वेबसाईटवर सुविधा (Subscribe) व तक्रार निवारण (Grievances) या दोन्ही सोयी उपलब्ध परिवहन खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या आर टी ओ व एस टी या खात्यासंबंधीच्या तक्रारी, सूचनां व अडचणीसाठी नागरिकांनी या संकेत स्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

तक्रार निवारण अधिकारी म्हणून अभिजीत भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर श्री भोसले यांना सहकार्य करण्यासाठी संबंधित खात्याच्या इतर चार अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. खात्याकडे आलेल्या तक्रारी किंवा सूचनांवर मंत्री महोदयांची शिफारस घेऊन शिफारशी नुसार तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असे .ही परिपत्रकात म्हंटले आहे.