मुरगूडच्या ओंकार पोतदार यांना राज्यस्तरीय गुरुवर्य युवारत्न  पुरस्कार जाहीर

मुरगूड ( शशी दरेकर ) : गुरूवर्य सेवा प्रतिष्ठान कोल्हापूर या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय गुरूवर्य पुरस्कारासाची घोषणा  नुकतीच करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तिंना हा पुरस्कार जाहिर करण्यात येतो. यावर्षी राज्यस्तरीय गुरुवर्य युवारत्न पुरस्कार मुरगुड ता. कागल येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ओंकार पोतदार याना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Advertisements

पंढरपूर, जयसिंगपूर, कोल्हापूर, सांगली अशा विविध ठिकाणी हा सोहळा अत्यंत दिमाखात यापूर्वी झाला आहे. यावर्षी गुरूवर्य पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथे रविवार दि. २२ जून २०२५ रोजी होणार असून या  कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ओंकार पोतदार यांना आतापर्यंत विविध ३५ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Advertisements

महापूर काळात, कोरोना काळात, तसेच प्रत्येक वेळी प्रत्येक सामाजिक कार्यात नेहमी हिरिरीने सहभागी असणारे पोतदार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!