कागल / प्रतिनिधी : वॅगनर कार ची धडक चुकविण्यासाठी एसटी रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र बसचे नुकसान झाले.हा अपघात रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पूना- बेंगलोर महामार्गावर लक्ष्मी टेकडी येथे झाला. झालेला अपघात हायवे पोलिसांच्या मुळेच झाला असल्याचे बसचालकाने बोलून दाखवले. अपघाताची नोंद कागल पोलिसांत झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बस क्रमांक एम एच -13 -सी यू -84 30 ही बस सावंतवाडीहून तुळजापूरकडे चालली होती. कागलच्या लक्ष्मी टेकडी जवळ वाहनांची तपासणी करण्यासाठी व अनपेड दंड वसुली करण्यासाठी हायवे पोलीस थांबलेले होते. ते वाहने अडवून कागदपत्रांची तपासणी करीत असतात. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महामार्ग पोलीसाने वॅगनर कारला थांबविण्याचा इशारा केला. कारचालक वेगवान होता.
त्या पाठोपाठ एसटी बस होती. पोलिसांचा इशारा पाहता वॅगनर कार चालकाने ब्रेक मारत कार अचानक रस्त्यातच थांबविली. त्यामुळे पाठीमागून जाणाऱ्या बस चालकाची धांदल उडाली .त्याने प्रसंगावधान राखून बस रस्ता दुभाजकावर एकदम आदळल्याने पुढील व मागील बाजूस एसटी चे नुकसान झाले.
दरम्यान रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली .सदर चा अपघात पाहता समोर उभे असलेल्या हायवे पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. एसटीच्या सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सुप्रिया जाधव मार्ग पोलीस पीएसआय श्री नलावडे, एपी आय कविता नाईक ,एसटीचे अधिकारी, कागल पोलीस ठाण्यातील पुजारी,माटूंगे,खोंडरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून बस बाजूला करण्यात आली व वाहतूक सुरळीत झाली.
पोलीसांमुळेच अपघात
आज झालेला अपघात हायवे पोलिसांच्या मुळेच झालेला आहे. बसमध्ये 15 प्रवासी होते. बस दुभाजकावर आदळली नसती तर वॅगनर कारचा चक्काचूर झाला असता व प्रवासी जखमी झाले असते.अशी खंत एसटी चालक विक्रांत गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.